आपके कार्ट में कोई आइटम नहीं हैं
अधिक जोड़ें
अधिक जोड़ें
आइटम विवरण | कीमत: |
---|
मशरूमचा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी एक पूरक उद्योग आहे.
आतापर्यंत मशरुमच्या शेतीमधून अनेकांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. मशरूमचे आहारातील महत्व लक्षात घेता सर्वसामान्य लोकांना स्वतंत्र व्यवसाय म्हणून मशरुम शेती हा चांगला व्यवसाय होऊ शकतो.
तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही प्रत्यक्ष शेती किंवा शेतीला पूरक असणाऱ्या व्यवसायात नशीब आजमवायला हरकत नाही. कारण, अलीकडच्या काळात पारंपारिक शेतमालाशिवाय आरोग्याच्यादृष्टीने अचानक महत्व प्राप्त झालेल्या पिकांची आणि उत्पादनांची मागणीही वाढली आहे. असाच एक व्यवसाय म्हणजे अळंबी किंवा मशरुमची शेती. मशरूम केवळ पौष्टिक आणि औषधी दृष्टिकोनातूनच नव्हे तर निर्यातीसाठी देखील महत्त्वाचे आहे. आतापर्यंत मशरुमच्या शेतीमधून अनेकांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
प्रफुल्ल शेंडे सर गेल्या 6 वर्षांपासून मशरूम शेती उद्योगात कार्यरत आहेत.
आणि अद्याप 1,000 हून अधिक तरुणांना मशरूम लागवडीचे प्रशिक्षण दिले आहे.